Shobhayatra

श्री ऋषीकेश शिक्षण प्रसारक मंडळ ,पनवेल यांच्या वतीने अयोध्यातील भव्यदिव्य श्री राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने शोभायात्रा आयोजित केली गेली होती. शोभायात्रेचे नेतृत्व चेअरमन श्री. धनराजजी विसपुते यांनी केले. जय श्री राम नारा लावत ही शोभायात्रा महाविद्यालापर्यंत आली. प्रभू श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठापनाचे थेट live प्रक्षेपण दादासाहेब श्री. धनराजजी विसपुते सभागृहामधे करण्यात आले.या शोभायात्रेसाठी सर्व विभागातील विद्यार्थी आणि प्राचार्या, व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.