Swacchata Abhiyaan 2026 – Part 2

Swacchata Abhiyaan 2026 || Shri DD Vispute School of Nursing, New Panvel

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान आदर्श शैक्षणिक समूहातर्फे विशेष ‘स्वच्छता अभियान’ व ‘सेवा सप्ताह अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. समाजामध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्यासाठी आणि आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. ✨
​याच अभियानांतर्गत श्री. डी. डी. विसपुते स्कूल ऑफ नर्सिंग, न्यू पनवेल येथील GNM * नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी *आरोग्य केंद्र, अजिवली, पनवेल येथे श्रमदान करत परिसर अत्यंत स्वच्छ केला. भावी आरोग्य सेवक म्हणून या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिलेला सेवेचा आणि स्वच्छतेचा संदेश खरोखरच अत्यंत प्रेरणादायी आहे! 🙏🎓🩺