Letter & Rakhi for Soldiers and Police Personnel

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक व पोलीस बांधवांना प्रेमाचे पत्र व राखी 🇮🇳

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज दिनांक १२/०८/२०२६ रोजी श्री. डी. डी. विसपुते स्कूल ऑफ नर्सिंग येथील विद्यार्थिनींनी देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या सीमेवरील शूर सैनिक व पोलीस बांधवांना प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचे पत्र व राखी पाठवली. 💌🎗️

देशाच्या रक्षणासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या या वीर बांधवांप्रती कृतज्ञता, आदर आणि राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचा हा छोटासा पण भावपूर्ण प्रयत्न. 🇮🇳❤️

✨ “सीमेवर तुमची कर्तव्यनिष्ठा, आणि आमच्या मनात तुमच्याविषयी सदैव आदर!” 🇮🇳