देह विठ्ठल, देह विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला च्या गजरात दुमदुमली अवघी आदर्श पंढरी
आदर्श शैक्षणिक समूह संचालित, आदर्श शिक्षक प्रशिक्षण केंद्र, श्री डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालय आणि श्री. डी.डी विसपुते स्कूल ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता, श्री. धनराज जी विसपुते सभागृह, देवद विचुंबे न्यू पनवेल. येथे
महाराष्ट्राची लोकधारा संकल्पनेतून
वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात पार पडला.
🚩महाराष्ट्र,
संस्कृती संगम
जागर लोककलेचा🚩
या शीर्षकांतर्गत या वर्षी देखिल वार्षिक कला महोत्सव साजरा करण्यात आला ✨💫
🚩 महाराष्ट्राची शान असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील, पनवेल नगरीत महाराष्ट्राला गौरविण्यासाठी, विविध संस्कृती, परंपरा आणि लोककला सादर करण्यासाठी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिन्ही विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले उत्कृष्ठ नृत्याविष्कार 🚩
- तुतारी, ढोल, ताशा, टाळ, लेझीम अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले.
- विद्यार्थिनींनी केलेल्या विविध कलाकृतींच्या प्रदर्शनाच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
- महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन, कन्या पूजन यांनी कार्यक्रमाचे उदघाटन झाले.
- राज्य गीताच्या जयघोशात सारा आसमंत दुमदुमून निघाला.
- एका अनोख्या शैलीतून तीनही प्राचार्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
- महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विविध लोककलेच्या प्रकारातून विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी देखिल नृत्याविष्कार सादर करून संस्कृती संगम उलगडला.
- होम मिनिस्टर, हळदीकुंकू अशा विविध महाराष्ट्रीयन कार्यक्रमातून कलाविष्कार सादर करण्यात आले
- सुप्रसिद्ध निवेदक श्री विनीत देव यांच्या दिमाखदार शैलीतून केलेल्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
- वंदे मातरम या राष्ट्रागीताने या सोहळयाचा समारोप झाला.
सदर सोहळ्यासाठी उपस्थिती लाभलेले मान्यवर
- अभिनेत्री :- श्रीमती उर्मिला डांगे
- डॉ.रत्नप्रभा भालेराव : प्राचार्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल
- डॉ. रमाकांत गायकवाड : चेअरमन AIM इन्स्टिटयूट मुंबई
- डॉ. जानकी पाटील : प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ
- श्री. धनराज जी विसपुते : चेअरमन आदर्श शैक्षणिक समूह, प्रदेश संयोजक पदवीधर प्रकुष्ट भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र
- सौ संगीता जी विसपुते : सचिव आदर्श शैक्षणिक समूह.
- विश्वस्त: श्री विजय शेठ सोनार
सौ वंदना सोनार, सौ परिमला
कारंजकर - समिती सदस्य : सौ प्रिया घेवडे, सौ अनिता जाधव, सौ रश्मी पाथरकर
- विविध विभागाचे प्रचार्य :
डॉ. आशिष जैन, फार्मसी कॉलेज, डॉ. विद्या मोहोड, सिनियर कॉलेज, डॉ. सीमा कांबळे, शिक्षण शास्त्र महाविद्यालय.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी, अभिनय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रामधून विविध मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, आणि सर्वात महत्वाचे विद्यार्थी वर्ग सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहीले आणि आवर्जून या सोहोळ्याचे साक्षीदार झाले त्या बद्दल सर्वांचे आभार .
🙏🏻🙏🏻 🙏🏻स्नेहांकित 🙏🏻
- प्राचार्या. सौ. जाई जगताप
- प्राचार्या. सौ. कुसुम मधाळे
- प्राचार्या. सौ. प्रज्ञा भगत.
- सर्व केंद्र संचालिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.



























