Swacchata Abhiyaan 2026 || Shri DD Vispute School of Nursing, New Panvel
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान आदर्श शैक्षणिक समूहातर्फे विशेष ‘स्वच्छता अभियान’ व ‘सेवा सप्ताह अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. समाजामध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्यासाठी आणि आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. ✨
याच अभियानांतर्गत श्री. डी. डी. विसपुते स्कूल ऑफ नर्सिंग, न्यू पनवेल येथील GNM आणि ANM नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी आरोग्य उपकेंद्र, पोयंजे, पनवेल येथे श्रमदान करत परिसर अत्यंत स्वच्छ केला. भावी आरोग्य सेवक म्हणून या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिलेला सेवेचा आणि स्वच्छतेचा संदेश खरोखरच अत्यंत प्रेरणादायी आहे! 🙏🎓🩺











