Seva Saptah Abhiyaan 2026

Seva Saptah Abhiyaan 2026 || Shri DD Vispute School of Nursing, New Panvel

💐 आदरांजली आणि सामाजिक सेवेचा संकल्प!💐
आदर्श शैक्षणिक समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्री बापूसाहेब डी. डी. विसपुते यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ‘सेवा सप्ताह अभियान उद्घाटन समारंभ’ अत्यंत उत्साहात पार पडला. या मोहिमेचा एक भाग म्हणून परिसरात विशेष ‘स्वच्छता अभियान’ राबवून परिसर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा सामाजिक संदेश देण्यात आला. 🧹✨
🤝 एकजूट आणि उत्स्फूर्त सहभाग!
आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन तथा भाजपा महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रकोष्ठाचे प्रदेश संयोजक श्री. धनराजजी देविदास विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सर्व विभागांचे सन्माननीय प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभागाने हा सेवा सप्ताह व स्वच्छता अभियान अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. 🏫👏