“जहाँ डाल डाल पर,
सोनेकीं चिडिया करती है बसेरा,
वह भारत देश है मेरा…”🇮🇳
१५ ऑगस्ट ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० ला आपला देश प्रजासत्ताक झाला… सर्व सत्ता प्रजेच्या हाती आली आणि म्हणूनच २६ जानेवारी हा
“प्रजासत्ताक दिन” म्हणून साजरा केला जातो… आज ७१ वा प्रजासत्ताक दिन… याचेच औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली आदर्श समूहामध्ये मोठ्या उत्साहात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला… .
आदर्श समूहाच्या देवद-विचुंबे संकुलामध्ये ७.४५ वाजता मा.श्री.कॅप्टन संदीप कुमार मेहता, मा.श्री.धनराजजी विसपुते, मा.सौ.संगिता विसपुते व सर्व विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारोह संपन्न झाला… या नंतर सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करून वेगळीच वातावरण निर्मिती केली… कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कॅप्टन संदिप कुमार मेहता यांनी आपल्या विविध अनुभवांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतील असे मार्गदर्शन केले तर आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी सर्वांना आपल्या उत्साहपूर्ण शब्दांत देशभक्तीवर अनेक उदाहरणे देत उपस्थितांना एक वेगळी दिशा दिली… यावेळी “भारत माता की जय” या घोषणेने सारे आसमंत दुमदुमले…