“हे मृत्युंजय… च्या माध्यमातून सर्वांनी अनुभूती घेतली वीर सावरकरांची…”
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे थोर तत्वज्ञ, ज्येष्ठ लेखक, प्रतिभावंत कवी, समाजसुधारक, उपयुक्ततावादी बुद्धिमत्तेचे, स्वदेशीबद्दल प्रचंड आग्रही असणारे… शतपैलू व्यक्तीमत्व असणारे महान क्रांतिकारक… जे केवळ “ने मजसी ने, परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला” या काव्यपंक्ती पुरतेच बऱ्याच जणांना माहीत आहेत… पण सावरकर यापेक्षा खूप वेगळे आहेत… हा इतिहास आजच्या विद्यार्थ्यांना माहीत व्हावा… सावरकरांनी अंदमानात मृत्यूशी दिलेल्या थरारक झुंजीची गाथा या नवीन पिढीला माहीत व्हावी या हेतूने आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती व अनामिका निर्मित “हे मृत्युंजय” हे नाटक आज दि.२९/११/२०१९ रोजी ६५० विदयार्थी व कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले… सलग दोन तास सर्वांनी या नाटकाच्या माध्यमातून प्रत्यक्ष सावरकर अनुभवले… या प्रसंगी मा.श्री.वालावलकर साहेब यांचे आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तर नाटकाच्या समारोपाला सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या मा.श्री.हरीष दुधाडे यांचा देखील आदर्श समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला… प्रस्तुत प्रसंगी आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते यांचा श्री.वालावलकर सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला…
या नाटकाच्या माध्यमातून सर्वांनी एक आगळीवेगळी ऐतिहासिक अनुभूती घेतली व स्वातंत्र्यवीर सावरकर एका वेगळ्या प्रकारे अनुभवले….