नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळ, वाशी यांचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२० मोठ्या उत्साहात सम्पन्न…..
आज दि.०९/०२/२०२०रोजी संत नरहरी महाराज पुण्यतिथी, सांस्कृतिक कार्यक्रम, सभासद व पाल्य गुणगौरव ,वार्षिक सर्वसाधारण सभा, महिला हळदीकुंकू समारंभ, जन्मबंध मार्गदर्शन व आरोग्य शिबिर” असा बहुरंगी कार्यक्रम आदर्श समूहाच्या देवद- विचुंबे संकुलामध्ये सम्पन्न झाला….प्रस्तुत कार्यक्रमासाठी धुळे म.न.पा महापौर मा.श्री.बापूसाहेब चंद्रकांतजी सोनार, मा.श्री.सुनीलतात्या देवरे, मा.श्री.सुनीलजी अहिरराव, मा.श्रीम.पिनलताई वानखेडे, मा.श्री.सुरेशजी मंदानेकर, मा.श्री.नांनासाहेब महेंद्रजी विसपुते, मा.नीती विसपुते, मा.श्री.शांताराम सोनार, नवी मुंबई सुवर्णकार समाज मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्यासह ३०० समाजबांधव उपस्थित होते…
सदर कार्यक्रमात प्रथम संत नरहरी महाराजांचा पालखी सोहळा ढोल ताश्याच्या गजरात पार पडला, या नंतर गणेश वंदना व स्वागतगीत आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला….यामध्ये विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या व्यक्तींचा व शालेय जीवनात यश संपादन करणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले….या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी मा.श्री.बापूसाहेब चंद्रकांतजी सोनार यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत आदर्श समूहाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या . यावेळी धुळे येथे उभारण्यात येणाऱ्या संत नरहरी महाराजांच्या पुतळ्यासाठी आदर्श समूहाच्या वतीने ५१,००० रु चा डी. डी. मा.श्री.चंद्रकांतजी सोनार यांच्याकडे मा.श्री.धनराजजी विसपुते, मा.श्री.नानासाहेब विसपुते व मा.सौ.संगिता विसपुते यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या नंतर आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी सम्पूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेत मागील आठवणींना उजाळा देऊन , पुढील कार्याची सर्वांना माहिती दिली. या प्रसंगी मागील वर्षी २४ फेब्रुवारीला धुळे येथे माजी लोकसभा अध्यक्षा मा.सुमित्रताईजी महाजन यांच्या शुभहस्ते कै. बापुसाहेब डी. डी. विसपुते उर्फ ऋषीमहाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कसे करण्यात आले याचा आढावा घेत संत नरहरी महाराजांच्या पुतळा उभारणीतील सर्वांची भूमिका समजावून दिली….यानंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली….या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील विजेत्यांना देखील पारितोषिक देण्यात आली. या नंतर खान्देशी पद्धतीने तयार करण्यात आलेल्या सुग्रास भोजनाचा सर्वानी आस्वाद घेतला… वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली…